मुंबई (खलील गिरकर) - राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलचे माजी प्रदेश अध्यक्ष अशोक जानोरकर यांचीमहाराष्ट्र कृषक समाज या संघटनेच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी खासदार विलास गुंडेवार यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचीसिंधुदुर्ग जि्ल्हा अध्यक्षपदी, वामनराव झाडे यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी, प्रकाश टाकसांडे यांचीगडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महराष्ट्र कृषक समाजाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीकॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. गोविंदराव आदिक यांच्याहस्ते या सर्वांना नियुक्तीपत्रे देण्यातआली. राष्ट्रवादी भवन येथे हा समारंभ पार पडला. यावेळी डॉ. गजानन देसाई, आर. सी. पाटीलआदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महावृत्त शी बोलताना खा. आदिक म्हणाले की, लवकरचकेंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कृषक समाजाच्या वतीने कृषी साहित्य संमेलनआयोजित करण्यात येईल.





You need to be a member of Media Club Of India - Global Media Network... to add comments!
Join Media Club Of India - Global Media Network...